तुमचाही लॅपटॉप गरम होतोय? म्हणजे तुम्हीही करताय 'या' चुका!

Mayuri Gawade

लॅपटॉप हा आपल्या दैनंदिन कामाचा महत्त्वाचा भाग असला तरी चुकीच्या वापरामुळे त्यात ओव्हरहिटिंगची समस्या निर्माण होऊ शकते. | सर्व छायाचित्र : पिंटरेस्ट
इलेक्ट्रॉनिक उपकरणे दीर्घकाळ चालू ठेवली असता ती गरम होणं नैसर्गिक असलं तरी लॅपटॉपमध्ये लिथियम-आधारित बॅटरी असल्याने धोका अधिक असतो.
बॅटरीवर जास्त दाब येणे, चुकीचा चार्जर वापरणे किंवा व्हेंट्स ब्लॉक होणे यामुळे बॅटरी स्फोट होण्याची शक्यता वाढते.
बेडवर, मांडीवर किंवा उष्णता अडवणाऱ्या पृष्ठभागावर लॅपटॉप वापरल्यास एअर व्हेंट्स रोखले जातात आणि गरम होण्याचा धोका वाढतो.
बॅकग्राऊंडमध्ये अनेक अ‍ॅप्स चालू राहिल्यासही सिस्टमवर ताण येऊन तापमान वाढते.
लॅपटॉपमधील फॅन व्यवस्थित काम करत नसल्यास अथवा वेंट्समध्ये धूळ अडकल्यास गरम होण्याची समस्या अधिक गंभीर बनू शकते.
त्यामुळे लॅपटॉप स्वच्छ ठेवणे, नको असलेले अॅप्स बंद करणे आणि आवश्यक असल्यास कूलिंग पॅडचा वापर करणे फायदेशीर ठरते.
डिव्हाइस चार्ज करताना फक्त कंपनीचा दिलेला चार्जर वापरणे सुरक्षित असते.
तसेच, लॅपटॉप वापरल्यानंतर तो फक्त बंद न करता व्यवस्थित शटडाउन करणेही तितकेच गरजेचे आहे.
या काही साध्या काळजीमुळे लॅपटॉपची कार्यक्षमता टिकून राहते आणि स्फोटासारख्या धोकादायक दुर्घटना टाळता येतात.