तुम्हालाही रात्री उशीरा जेवायची सवय आहे? वेळीच थांबा, होतील अनेक आजार
Krantee V. Kale
बदलत्या जीवनशैलीचा परिणाम खाण्या-पिण्याच्या सवयींवरही होतो. त्यातच रात्री उशीरा जेवणे, किंवा मध्यरात्री क्रेव्हिंग झाल्यावर बाहेरचे खाणे सामान्य झाले आहे. | All photos- Yandex
पण तुम्हाला माहितीये का,रात्री उशीरा जेवल्यानंतर आरोग्यावर कोणता परिणाम होतो जाणून घ्या.
रात्री उशिरा जेवण करण्याचा सर्वात मोठा तोटा म्हणजे वजन लवकर वाढू शकते. म्हणून, जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर उशिरा जेवू नका. यामुळे तुमच्या पचनाची गती मंदावते.
ज्यांना झोपेशी संबधित समस्या आहेत त्यांनी रात्री उशिरा जेवू नये. उशिरा जेवल्याने पोटात जड वाटू शकते आणि झोप बिघडू शकते.
रात्री उशिरा जेवल्याने पचनसंस्था पूर्णपणे विश्रांती घेऊ शकत नाही. यामुळे अॅसिडिटी, गॅस आणि बद्धकोष्ठता यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
मधुमेही रुग्णांनी कधीही रात्री उशिरा जेवू नये. यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणाबाहेर जाऊ शकते आणि आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
अपरात्री खाण्याच्या सवयीमुळे हृदयाशी संबंधित आजार होऊ शकतात. म्हणूनच, जर हृदय निरोगी ठेवायचे असेल तर रात्री उशिरा जेवणे टाळावे.
आरोग्याच्या समस्या टाळण्यासाठी वेळेवर जेवण करावे आणि रात्री उशिरा जेवण करणे टाळावे. संध्याकाळी ६ ते ८ दरम्यानचा वेळ जेवणासाठी सर्वोत्तम मानला जातो.
(Disclaimer: या लेखात दिलेले आरोग्यविषयक सल्ले सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. नवशक्ति’ यातून कोणताही दावा करत नाही.)