लग्नसमारंभासाठी खास ब्लाऊज डिझाइन्स! या स्टायलिश पॅटर्न्समुळे साडीला मिळेल परफेक्ट लूक
Mayuri Gawade
साडीचा लूक उठावदार बनवायचा असेल, तर ब्लाऊज डिझाइन तितकंच महत्त्वाचं ठरतं.
लग्न, पार्टी किंवा खास प्रसंगांसाठी हे युनिक ब्लाऊज पॅटर्न्स तुमचा स्टाइल गेम नक्कीच वाढवतील.
टसल बॅक ब्लाऊज - गोल बॅक कट आणि लटकन डिटेलमुळे हा ब्लाऊज पारंपरिक साडीलाही उठावदार आणि एलिगंट लूक देतो.
क्रिसक्रॉस स्ट्रॅप ब्लाऊज - पाठीमागील क्रॉस स्ट्रॅप डिझाइनमुळे हा ब्लाऊज मॉडर्न, स्टायलिश आणि पार्टीवेअर लूकसाठी परफेक्ट ठरतो.
बो बॅक ब्लाऊज - मोठ्या बो डिटेलमुळे हा ब्लाऊज साध्या साडीलाही खास आणि हटके आकर्षण देतो.
बीडवर्क स्लीव्ह ब्लाऊज - स्लीव्हवरील नाजूक बीडवर्क आणि सॉफ्ट कटमुळे हा ब्लाऊज लग्नसमारंभासाठी अतिशय ग्रेसफुल दिसतो.
शीअर स्लीव्ह एम्ब्रॉयडर्ड ब्लाऊज - हलके पारदर्शक स्लीव्हज आणि भरजरी एम्ब्रॉयडरीमुळे हा ब्लाऊज रॉयल आणि क्लासी लूक देतो. .
कटआउट बॅक ब्लाऊज - पाठीमागील स्टायलिश कटआउट पॅटर्नमुळे हा ब्लाऊज ट्रेडिशनल आणि ग्लॅमरस लूकचा सुंदर मिलाफ वाटतो.
स्ट्रक्चर्ड बॅक ब्लाऊज - पाठीमागील सरळ आणि उठावदार डिझाइनमुळे हा ब्लाऊज नीटनेटका, एलिगंट आणि डिझायनर फिनिश देतो.
डीप बॅक सिक्विन ब्लाऊज - डीप बॅक आणि चमकदार सिक्विन वर्कमुळे हा ब्लाऊज रिसेप्शन, कॉकटेल किंवा पार्टीसाठी परफेक्ट ठरू शकतो.
ऑफ-शोल्डर ड्रेप ब्लाऊज - ऑफ-शोल्डर पॅटर्न आणि ड्रेप स्टाइलमुळे हा ब्लाऊज बोल्ड, फॅशनेबल आणि पूर्णपणे स्टेटमेंट लूक देतो