उरलेला भात फेकू नका! ८ दिवसांतून एकदा चेहऱ्यावर लावा; त्वचेवर येईल नैसर्गिक ग्लो
Mayuri Gawade
उरलेला भात फेकू नका! त्वचेचा नैसर्गिक ग्लो वाढवण्यासाठी त्याचा असा करा वापर.
१ चमचा शिजवलेला भात घ्या आणि त्यात थोडंसं पाणी घालून ८ ते १० तास भिजत ठेवा.
भिजवलेला भात मिक्सरमध्ये बारीक वाटून गुळगुळीत पेस्ट तयार करा.
या पेस्टमध्ये ताज्या बटाट्याचा रस मिसळा. त्यामुळे त्वचेवरील पिगमेंटेशन कमी होण्यास मदत होऊ शकते.
त्वचा कोरडी असेल तर मिश्रणात काही थेंब बदामाचं तेल घाला. त्यामुळे त्वचेला ओलावा मिळतो.
सर्व साहित्य एकजीव करून तयार फेस पॅक चेहरा आणि मानेवर समान प्रमाणात लावा.
हा फेस पॅक १५ मिनिटे त्वचेवर राहू द्या, त्यानंतर साध्या पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा.
हा उपाय आठवड्यातून एकदा किंवा ८ दिवसांतून एकदा केल्यास त्वचा अधिक तजेलदार दिसण्यास मदत होऊ शकते.
कोणताही घरगुती उपाय करण्यापूर्वी त्वचेच्या छोट्या भागावर पॅच टेस्ट करा. संवेदनशील त्वचा असल्यास त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या. | All Photos : Ai Generated