आधार कार्ड हरवलंय? नो टेन्शन; सोप्या टिप्स करा फॉलो, घरसबसल्या मिळेल नवीन कार्ड
Krantee V. Kale
आजच्या काळात, आधार कार्ड हे प्रत्येक भारतीयासाठी सर्वात महत्त्वाचे कागदपत्र बनले आहे. | All Photos- Yandex
सरकारी योजनांपासून ते मोबाईल सिम किंवा शाळेच्या प्रवेशापर्यंत कोणत्याही अधिकृत कामासाठी आधार कार्ड आवश्यक आहे.
पण काहीवेळा आपण ते सुरक्षित ठेवायला विसरतो. त्यामुळे ते हरवण्याची शक्यता असते.
जर तुमचेही आधार कार्ड हरवले असेल तर तुम्ही घरबसल्या नवीन आधार कार्ड डाउनलोड करू शकता. पण कसं, जाणून घ्या.
आधार कार्ड हरवल्यास नवीन आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी, प्रथम UIDAI वेबसाइटला भेट द्या.
यानंतर, My Aadhaar विभागात Retrieve Lost or Forgotten UID/EID वर क्लिक करा.
आता तुम्हाला नाव, जन्मतारीख आणि नोंदणीकृत मोबाईल नंबर किंवा ईमेल टाकून नंतर कॅप्चा कोड टाकावा लागेल.
यानंतर तुम्हाला एक OTP मिळेल, तो व्हेरिफाय करा. ओटीपी व्हेरिफाय झाल्यानंतर, तुमचा आधार तपशील स्क्रीनवर दिसेल.
त्यानंतर, तुमचे आधार कार्ड तुम्हाला एसएमएस किंवा इमेलद्वारे देखील पाठवले जाईल.