Health Tips : पायऱ्या चढताना धाप लागते? ‘हे’ ५ व्यायाम फुफ्फुसांना देतील ताकद

Mayuri Gawade

वय वाढल्यानंतर चालताना किंवा पायऱ्या चढताना धाप लागण्याचा त्रास अनेकांना जाणवू लागतो.
कमी वयातच दम लागण्याची समस्या वाढत असेल, तर फुफ्फुसांची ताकद वाढवण्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे.
नियमित व्यायाम आणि श्वसनाचे व्यायाम केल्याने फुफ्फुसांची कार्यक्षमता सुधारण्यास मदत होऊ शकते.
मत्स्यासन केल्याने छातीचा भाग ताणला जातो आणि श्वसनक्रिया सुधारण्यास मदत मिळते.
गोमुखासनामुळे फुफ्फुसांसोबत शरीरातील इतर स्नायूंचाही चांगला व्यायाम होतो.
अनुलोम-विलोम प्राणायाम नियमित केल्याने श्वसनाचा त्रास कमी होण्यास मदत होते.
कपालभाती प्राणायाम फुफ्फुसांची ताकद वाढवण्यासाठी आणि श्वसन सुधारण्यासाठी फायदेशीर मानला जातो.
रोज काही मिनिटे हे व्यायाम केल्यास दम लागण्याचा त्रास कमी होऊन शरीर अधिक सक्रिय राहू शकते. | All Photos : AI Generated