खलनायिकेचा ग्लॅमरस अंदाज! हिरव्या सिल्क साडीत माधवी निमकरचं सौंदर्य खुललं; फोटो पाहिलेत का?

Mayuri Gawade

मराठी मालिकांमधील दमदार खलनायिकांच्या भूमिकांमुळे अभिनेत्री माधवी निमकरने प्रेक्षकांच्या मनात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
अभिनयासोबतच माधवी तिच्या फिटनेस, फॅशन सेन्स आणि पारंपरिक साडी लूकमुळेही चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते.
माधवीने नुकतेच इंस्टाग्रामवर हिरव्या रंगाच्या सिल्क साडीतील खास फोटोशूट शेअर केले असून, तिचा हा पारंपरिक अंदाज लक्षवेधी ठरला आहे.
हिरव्या आणि सोनेरी रंगसंगतीची आकर्षक नक्षी असलेली सिल्क साडी नेसून माधवीने आपल्या सौंदर्याला एक वेगळाच साज चढवला आहे.
या साडीवर माधवीने हिरव्या रंगाचा मॅचिंग ब्लाऊज परिधान केला असून, त्यावरील सोनेरी नक्षीकाम तिच्या लूकला अधिक उठावदार बनवत आहे.
गळ्यात मोत्यांचा आकर्षक चोकर, कानात झुमके आणि हातात मोठ्या अंगठ्या घालून माधवीने आपल्या पारंपरिक लूकला रॉयल टच दिला आहे.
मोकळे सोडलेले लांबसडक केस, कपाळावर छोटी हिरवी टिकली आणि हलक्या गुलाबी मेकअपमुळे माधवीचा हा साडीतील लूक अधिकच खुलून दिसत आहे.
सध्या माधवी स्टार प्रवाहवरील ‘तुझ्या सोबतीने’ या मालिकेत ‘तायडी’ ही धूर्त आणि महत्त्वाकांक्षी खलनायिका साकारत असून, तिच्या दमदार अभिनयाची पुन्हा एकदा चर्चा होत आहे. | All Photos : Instagram | Madhavi Nemkar