नऊवारी, नथ अन् मराठमोळा साज; माधवी निमकरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

किशोरी घायवट-उबाळे

सणासुदीचे दिवस आणि सुखमय वातावरण! अशी कॅप्शन देत अभिनेत्री माधवी निमकरने नऊवारी साडीतील खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
पारंपरिक नऊवारी, नाजूक दागिने आणि मराठमोळा साज असा माधवीचा मनमोहक लूक पाहायला मिळत आहे.
कपाळावरची चंद्रकोर, नथ आणि पारंपरिक दागिन्यांनी तिच्या लूकला खास मराठमोळा टच दिला आहे.
गणेशोत्सवाच्या उत्साहात माधवीचा हा नऊवारी लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.
सोशल मीडियावर फोटो शेअर करताच चाहत्यांनी तिच्या या पारंपरिक अंदाजाचे कौतुक केले आहे.
या लूकमध्ये माधवी निमकरचे सौंदर्य आणखी खुलून दिसत आहे.
माधवीचा हा सुंदर मराठमोळा लूक सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.