'तू ही रे माझा मितवा' फेम मधुरा जोशीचा सोनेरी साडीतील मोहक अंदाज; फोटो एकदा पाहाच
किशोरी घायवट-उबाळे
'तू ही रे माझा मितवा' फेम मधुरा जोशीने सोनरी साडीतील नवे फोटो शेअर करत चाहत्यांची मनं जिंकली.
सोनेरी डिझायनर साडी आणि मरून ब्लाऊजच्या आकर्षक कॉम्बिनेशनमध्ये मधुरा अत्यंत देखणी दिसत आहे.
फोटोंना मधुराने दिलेलं "गौराई की रखुमाई?" हे कॅप्शन चाहत्यांचं विशेष लक्ष वेधून घेत आहे.
मधुराच्या पारंपरिक लूकवर चाहत्यांनी कमेंट्स आणि लाइक्सचा पाऊस पाडला आहे.
'तू ही रे माझा मितवा' मालिकेत 'नम्रता देसाई'च्या भूमिकेतून मधुरा प्रेक्षकांची पसंती मिळवत आहे.
मधुरा जोशी अभिनयाइतकीच तिच्या एलिगंट फॅशन सेन्समुळेही नेहमी चर्चेत असते.
पारंपरिक लूक, साधेपणा आणि आत्मविश्वास यामुळे मधुराचं हे फोटोशूट चाहत्यांसाठी खास ठरत आहे.
सहकलाकार शर्वरी जोगने काढलेले मधुराचे फोटो सध्या चर्चेत आले आहेत.