गणेशोत्सवात माधुरी दीक्षितचा पारंपरिक अंदाज; पटोला साडीतील दिलखेचक लूक एकदा पाहाच!

Mayuri Gawade

गणेशोत्सवाच्या निमित्ताने माधुरी दीक्षितने सोज्वळ पारंपरिक लूकमध्ये चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
लाल, हिरवा आणि निळ्या रंगांची उठावदार सांगड असलेली पटोला सिल्क साडी माधुरीने खास अंदाजात नेसली आहे.
साडीवरील नाजूक नक्षीकाम आणि आकर्षक बॉर्डरमुळे तिचा पारंपरिक लूक अधिक खुलून दिसत आहे.
साडीला मॅचिंग असलेल्या सुंदर एम्ब्रॉयडरी ब्लाऊजने माधुरीने लूकला शाही टच दिला आहे.
कुंदन आणि मोत्यांच्या झुमक्यांनी माधुरीचा पारंपरिक साज आणखी खुलला आहे.
नक्षीदार कडे आणि उठावदार अंगठीने तिने आपल्या लूकमध्ये दागिन्यांची सुंदर भर घातली आहे.
मोकळे केस आणि त्यावर सजलेला गजरा; माधुरीचा हा अंदाज साधेपणातही खास दिसतोय.
चेहऱ्यावरचं प्रसन्न हास्य आणि पारंपरिक साजामुळे माधुरीच्या या लूकची मोहिनी आणखी वाढली आहे.
‘रंग, उत्सव आणि बाप्पाचा आशीर्वाद… याहून सुंदर काय असू शकतं? गणपती बाप्पा मोरया!’ या खास कॅप्शनसोबत माधुरीने गणेशोत्सवातील हे सुंदर क्षण चाहत्यांसोबत शेअर केले. | (सर्व फोटो : माधुरी दीक्षित/इंस्टाग्राम)