Madhuri Dixit Photos : नऊवारी साडीतील माधुरीचा देखणा अंदाज; मराठमोळ्या सौंदर्याची चाहत्यांना भुरळ

किशोरी घायवट-उबाळे

दिवाळीचा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होत असताना बॉलीवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षितने आपल्या खास मराठमोळ्या लूकने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
माधुरीने गुलाबी आणि केशरी रंगांची सुंदर सांगड असलेली आकर्षक नऊवारी साडी नेसली आहे.
या साडीला असलेली सोनेरी काठाची नक्षी तिच्या लूकला अधिक पारंपरिक आणि शाही टच देत आहे.
कपाळावर छोटीशी गुलाबी टिकली आणि नाकातील पारंपरिक नथ यामुळे तिच्या सौंदर्यात आणखी भर पडली आहे.
साडीला मॅचिंग अशी गुलाबी रंगाची डिझायनर ब्लाऊज परिधान करून तिने आपला लूक आणखी खुलवला आहे.
माधुरीने केसांना सुंदर वेव्ही स्टाईल देत त्यामध्ये गुलाबी गुलाबाचे फूल माळले आहे.
गळ्यातील आकर्षक पारंपरिक हार, कानातील झुमके आणि हातातील बांगड्यांनी तिचा मराठमोळा साज पूर्ण केला आहे.
हलका मेकअप, गुलाबी लिपस्टिक आणि चेहऱ्यावरील मोहक हास्य यामुळे माधुरीचा हा पारंपरिक लूक अधिकच खुलून दिसत आहे.
टेलिव्हिजनवरील लोकप्रिय कार्यक्रम 'कोण होणार करोडपती'च्या दिवाळी विशेष भागात माधुरीचा हा खास अंदाज पाहायला मिळणार असल्याने तिच्या चाहत्यांमध्येही उत्सुकता आहे.