Madhuri Dixit Photos : जांभळ्या साडीत माधुरीचा शाही थाट; केसांतील फुलं अन् मोहक अदांनी वेधलं लक्ष

किशोरी घायवट-उबाळे

बॉलीवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षितने सोशल मीडियावर तिच्या नव्या फोटोशूटमधील काही खास फोटो शेअर केले आहेत.
सध्या 'कोण होणार करोडपती' या लोकप्रिय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणारी माधुरी जांभळ्या रंगाच्या देखण्या बनारसी साडीत शोभून दिसत आहे.
साडीच्या रेशमी पोतामुळे आणि विणकामामुळे तिच्या लूकला एक वेगळीच शाही झळाळी मिळाली आहे.
साडीवरील मॅचिंग प्लेन ब्लाउज सोनेरी काठ आणि बॅक डिझाइनमुळे अधिकच खुलून दिसत आहे.
कानात आकर्षक झुमके आणि हातात कडे घालून तिने आपल्या लूकला पूर्णत्व दिले आहे.
माधुरीने केसांचा अंबाडा बांधून त्यात गुलाबी आणि पांढऱ्या रंगांची फुले माळली आहेत, ज्यामुळे तिच्या सौंदर्यात आणखी भर पडली आहे.
तिच्या चेहऱ्यावरील मोहक हास्य, नजरेतील अदा आणि आत्मविश्वासपूर्ण पोझेसमुळे हे फोटोशूट अधिकच आकर्षक झाले आहे.
पारंपरिक साडीतील माधुरीचा हा एलिगंट लूक सणासुदीच्या आणि खास समारंभांच्या फॅशनसाठी चाहत्यांना नक्कीच प्रेरणा देणारा आहे.