Madhuri Dixit Look : जांभळ्या रंगाच्या भरजरी अनारकलीत माधुरी दीक्षितचा शाही अंदाज; सोनेरी नक्षी अन् दागिन्यांनी वेधलं लक्ष
किशोरी घायवट-उबाळे
अभिनेत्री माधुरी दीक्षितने सोशल मीडियावर शेअर केलेल्या नव्या फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
सध्या 'कोण होणार मराठी करोडपती' या लोकप्रिय कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणारी माधुरी या फोटोंमध्ये सुंदर पारंपरिक लूकमध्ये दिसत आहे.
तिने जांभळ्या रंगाचा भरजरी अनारकली ड्रेस परिधान केला असून, त्यावर केलेली सोनेरी नक्षी विशेष लक्षवेधी ठरत आहे.
ड्रेसच्या गळ्याभोवती आणि बाह्यांवर असलेल्या हेवी एम्ब्रॉयडरीमुळे या पोशाखाला रॉयल लूक मिळाला आहे.
या ड्रेससोबत तिने जांभळ्या रंगाची ओढणी घेतली असून, तिच्या लूकमध्ये पारंपरिकतेसोबतच आकर्षकपणाही पाहायला मिळतो.
दागिन्यांमध्ये तिने सोनेरी रंगाचे हिरव्या खड्यांनी सजवलेले झुमके परिधान केले आहेत, जे तिच्या लूकला सुंदर उठाव देत आहेत.
कपाळावर छोटीशी टिकली आणि हलक्या वेव्ही स्टाइलमधील मोकळे केस यामुळे तिचं सौंदर्य अधिक खुलून दिसत आहे.
तिच्या या साध्या पण शाही अंदाजाने चाहत्यांना पुन्हा एकदा तिच्या सौंदर्याची आणि फॅशन सेन्सची भुरळ घातली आहे.