सौंदर्याला वयाचं बंधन नसतं! 'धकधक गर्ल' माधुरी दीक्षितचा काळ्या साडीतील खास अंदाज
Mayuri Gawade
बॉलीवूडची ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित आजही आपल्या सौंदर्याने, मोहक हास्याने आणि दिलखेचक अदांनी चाहत्यांची मनं जिंकते. अभिनयासोबतच तिच्या फॅशनचीही नेहमीच चर्चा रंगत असते.
सोशल मीडियावर सक्रिय असणारी माधुरी आपल्या चाहत्यांसोबत नवनवीन फोटो शेअर करत असते. नुकतेच तिने काळ्या साडीतील खास फोटो शेअर केले असून, तिच्या या आकर्षक लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
या फोटोशूटमध्ये माधुरीने काळ्या रंगाची सुंदर साडी नेसली आहे. साडीवरील सोनेरी आणि चंदेरी छटेतील नाजूक नक्षीकाम तिच्या पारंपरिक लूकला शाही उठाव देत आहे.
काळ्या साडीसोबत माधुरीने त्याच रंगाचा आकर्षक ब्लाऊज परिधान केला आहे. ब्लाऊजच्या खांद्यावरील खास डिझाइनमुळे तिच्या पारंपरिक लूकला आधुनिक फॅशनची जोड मिळाली आहे.
कानात मोठे झुमके, बोटात आकर्षक अंगठी आणि कपाळावर छोटीशी काळी टिकली अशा मोजक्या दागिन्यांनी माधुरीने आपला लूक पूर्ण केला आहे. तिचा हा साधा पण उठावदार साज लक्ष वेधून घेत आहे.
मोकळे सोडलेले लांबसडक केस, हलका मेकअप आणि चेहऱ्यावरील आत्मविश्वास यामुळे माधुरीचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे. तिच्या या क्लासी अंदाजाला एक वेगळाच ग्लॅमरस टच मिळाला आहे.
कधी साडीचा पदर अलगद सावरत, तर कधी कॅमेऱ्यासमोर आत्मविश्वासाने पोझ देत माधुरीने आपला खास अंदाज दाखवला आहे. काळ्या साडीतील तिच्या दिलखेचक अदा विशेष लक्षवेधी ठरत आहेत.
वयाच्या ५९ व्या वर्षीही माधुरीचा एव्हरग्रीन चार्म कायम आहे. काळ्या साडीतील तिचे हे फोटो पाहून सौंदर्य आणि अभिजात फॅशनचा सुंदर संगम पुन्हा एकदा अनुभवायला मिळतो.