आजही तितकीच सुंदर! गुलाबी-पिवळ्या साडीत माधुरी दीक्षितचा एलिगंट अंदाज
Mayuri Gawade
बॉलिवूडची ‘धक धक गर्ल’ माधुरी दीक्षित पुन्हा एकदा आपल्या मोहक स्टाईलने चाहत्यांची मनं जिंकताना दिसली.
गुलाबी-पिवळ्या साडीतील माधुरीचा हा साधा पण देखणा लूक सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
मिनिमल मेकअप, सॉफ्ट ग्लॉसी लिप्स आणि नैसर्गिक चमक यामुळे तिचं सौंदर्य आणखी खुलून दिसत आहे.
फुलांनी सजवलेला बन हेअरस्टाईल आणि स्टेटमेंट इअररिंग्सने तिच्या पारंपरिक लूकला खास आकर्षण मिळालं आहे.
कॅमेऱ्यासमोर दिलेल्या प्रत्येक पोझमध्ये माधुरीचा आत्मविश्वास आणि ग्रेस सहजपणे झळकताना दिसतो.
उडणाऱ्या पदरासोबत दिलेल्या पोझमुळे या फोटोशूटला एक वेगळीच सिनेमॅटिक झलक मिळाली आहे.
तीन दशकांहून अधिक काळानंतरही फॅशन आणि स्टाईलच्या बाबतीत माधुरी दीक्षित आजच्या अभिनेत्रींसाठी प्रेरणास्थान ठरत आहे.
चित्रपट, ओटीटी प्रोजेक्ट्स आणि रिअॅलिटी शोमधील उपस्थितीमुळे माधुरी चाहत्यांमध्ये कायम चर्चेत असते. या नव्या फोटोशूटने तिच्या एलिगन्सची पुन्हा एकदा झलक दिली आहे.
“Twirling through colours that look like they were borrowed from a summer sunset” असे कॅप्शन देत माधुरीने हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले असून चाहत्यांकडून त्यावर भरभरून प्रेमाचा वर्षाव होत आहे. | All Photos : Instagram (Madhuri Dixit)