अमेरिकेतही शिवाली परबचा देसी स्वॅग! पिवळ्या पंजाबी ड्रेसमधील गोड फोटो पाहून चाहते फिदा

Mayuri Gawade

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्री शिवाली परबने नुकतेच अमेरिकेतील काही सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
आपल्या विनोदी अभिनयाने महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेली शिवाली सध्या अमेरिकेत सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.
अमेरिकेतील या सहलीदरम्यान शिवालीने पिवळ्या रंगाचा सुंदर पंजाबी ड्रेस घालून खास फोटोशूट केलं आहे.
पिवळ्या ड्रेसवर गुलाबी रंगाची ओढणी घेत शिवालीने आपल्या साध्या आणि सुंदर देसी अंदाजाने लक्ष वेधून घेतलं आहे.
या फोटोशूटसाठी शिवालीने केसांची पोनीटेल बांधली असून कपाळावर आलेल्या बटा तिच्या लूकला आणखी खुलवत आहेत.
कानातील लांब झुमके, हलका मेकअप आणि चेहऱ्यावरील गोड हास्यामुळे शिवाली या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.
कधी कमरेवर हात ठेवून, तर कधी गालाजवळ हात नेत शिवालीने कॅमेऱ्यासमोर एकापेक्षा एक हटके पोझ दिल्या आहेत.
एका फोटोमध्ये शिवाली हात पसरून अगदी मनमोकळेपणाने आनंद व्यक्त करताना दिसत असून तिचा हा मस्तीखोर अंदाज लक्ष वेधून घेत आहे.
परदेशातील आधुनिक इमारती आणि सुंदर निसर्गाच्या पार्श्वभूमीवर शिवालीचा पारंपरिक पंजाबी ड्रेसमधील लूक चांगलाच खुलून दिसत आहे.
शिवालीने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटोंमधील तिचा गोड आणि हटके अंदाज पाहून चाहतेही तिच्या सौंदर्याचं कौतुक करत आहेत.
All Photos : Instagram | Shivali Parab