मकरसंक्रांतीला काळेच कपडे का? केवळ फॅशन नव्हे...तर 'हे' आहे खरं कारण

Mayuri Gawade

तसं तर भारतीय संस्कृतीमध्ये काळ्या रंगाला अशुभ मानलं जातं. पण, याला अपवाद ठरणारा एकमेव सण म्हणजे मकरसंक्रांती. | सर्व छायाचित्रे : पिंटरेस्ट
इतर शुभ प्रसंगी टाळला जाणारा काळा रंग या दिवशी आवर्जून परिधान केला जातो आणि तोच या सणाची खास ओळख ठरतो.
मकरसंक्रांतीला काळा पोशाख घालण्यामागे केवळ फॅशन नाही, तर ऋतूबदल, आरोग्य आणि सकारात्मकतेशी जोडलेली एक सुंदर परंपरा दडलेली आहे.
काळ्या रंगाची वस्त्रे ही बाहेरची उष्णता शोषून घेऊन शरीर उबदार ठेवतात म्हणून थंडीमध्ये येणाऱ्या या सणाला म्हणजेच मकर संक्रांतीला काळ्या रंगाची वस्त्रे नेसण्याची प्रथा आहे.
काळ्या रंगाची वस्त्रे उष्णता शोषून घेऊन शरीराला उब देण्यासाठी फायदेशीर ठरतात.
त्यामुळे संक्रांत जवळ आली की बाजारांमध्ये काळ्या साड्या आणि काळी झबली दिसू लागतात.
नववधूंसाठी या सणाचे विशेष महत्व देण्यात येते. नवविवाहित वधूच्या पहिल्या संक्रांतीला तिला काळी साडी व हलव्याचे दागिने भेट दिले जातात.
बाळाच्या पहिल्या संक्रांतीनिमित्त त्यालाही काळ्या रंगाचे कपडे व हलव्याचे दागिने घातले जातात. त्यामुळे या वस्तूंची खरेदी संक्रातीला प्रामुख्याने केली जाते...