मकर संक्रांत स्पेशल: घरच्या घरी बनवा तिळाची चिक्की

Swapnil S

नवीन वर्ष सुरु होताच, वेध लागतात ते संक्रांतीचे. इंग्रजी वर्षातील हा पहिला सण. एकच सण ज्या दिवशी आपण काळ्या रंगाचे कपडे घालून मिरवू शकतो. गुलाबी थंडीत बोरं, चिंचा, पेरू, आवळे खाणे आरोग्यदायी तर असतेच पण शरीराला उष्णता मिळावी म्हणून आपल्या खाण्यात तीळ, शेंगदाणे, खोबरे, चनाडाळ आणि गुळ या पदार्थांचा वापर पण महत्वाचा असतो. | PM
साहित्य: १०० ग्राम चिक्कीचा गुळ, १५० ग्राम साधा गुळ, २५० ग्राम पौलीश तीळ, अर्धा छोटा चमचा सुंठ पावडर ,१ छोटा चमचा वेलची पावडर ,१ चमचा केशर अर्क ,१ मोठा चमचा साजूक तूप | PM
एका nonstick कढईत तीळ घालून मंद आचेवर १० ते १२ मिनटे सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे. भाजलेले तीळ थंड झाले की ते जाडसर वाटून त्याची भरड करायची. परत त्याच कढईत दोन्ही गुळ बारीक चिरून घ्यायचे. मध्यम gas वर गुळ गरम करायला ठेवायचे. त्यात एक चमचा तूप आणि ३ चमचे पाणी घालायचे. | PM
गुळ वितळला आणि बुडबुडे दिसायला लागले की सुंठ आणि वेलची पावडर घालायची. भरडलेले तीळ घालायचे आणि gas बंद करायचा. केशर अर्क घालून पटापट ढवळून सगळं एकत्र करायचं. एका ताटलीला तूप लावायचं आणि तीळ गुळच मिश्रण त्यात टाकून वाटीच्या मागच्या बाजूला तूप लावून थापायचं. एका लाटण्याला तूप लावून लेवल करायचं. झटपट वड्या कापून घ्यायच्या | PM