मकर संक्रांतीसाठी पारंपरिक आणि साजेसा लूक कसा कराल? जाणून घ्या सोप्या टिप्स

किशोरी घायवट-उबाळे

पारंपरिक साडी किंवा कुर्ता परिधान करा : नऊवारी साडी, पैठणी, काठपदराची साडी किंवा कुर्ता-पायजमा असा पोशाख संक्रांतीसाठी उत्तम ठरतो. | (सर्व छायाचित्रे: Yandex)
क्लासिक ब्लाऊज डिझाइन : संक्रांतीसाठी फुल स्लीव्ह किंवा बोट नेक ब्लाऊज उत्तम पर्याय ठरू शकेल.
उठावदार दागिने घाला : सोन्याचे किंवा ऑक्सिडाईज दागिने तुमच्या लूकला पारंपरिक टच देतील.
पारंपरिक ठुशी, नथ, बांगड्या तुमचा लूक खुलवतील.
सणावाराला केसांचा अंबाडा बेस्ट ऑप्शन मानला जातो. तुम्ही वेणी किंवा मोकळे केसही ठेऊ शकता. यासोबत गजरा असेल तर लूक अधिक खुलून दिसेल.
नॅचरल मेकअप ठेवा : हलके फाउंडेशन, काजळ, टिकली आणि लिपस्टिक यामुळे पारंपरिक सौंदर्य उठून दिसते.
योग्य पादत्राणांची निवड करा: कोल्हापुरी चप्पल, मोजडी किंवा पारंपरिक टच असलेली सॅंडल तुमच्या लूकला साजेशी ठरेल.
हसरा चेहरा आणि आत्मविश्वास ठेवा : कोणताही लूक परफेक्ट करण्यासाठी हसरा चेहरा आणि आत्मविश्वास महत्त्वाचा असतो.
तर मग यंदाच्या संक्रांतीला या टिप्स वापरून तुमचे सौंदर्य खुलवा.
(Disclaimer: या लेखात दिलेले सल्ले सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. नवशक्ति' यातून कोणताही दावा करत नाही.)