मकर संक्रांत साजरी करण्यासाठी भारतातील विविध राज्यांमध्ये त्यांच्या स्वतःच्या काही विषेश परंपरा आणि प्रथा आहेत. हा सण पंजाबमध्ये लोहरी, तामिळनाडूमध्ये पोंगल, गुजरातमध्ये उत्तरायण आणि उत्तर प्रदेशात अनेक ठिकाणी खिचडी उत्सव अशा नावांनी ओळखला जातो. हा सण जरी वेगवेगळ्या नावाने साजरा केला जात असला तरी याचे कारण मात्र सूर्याचे राशीपरिवर्तन आहे. यंदा 15 जानेवारीला मकर संक्रातं साजरी केली जाणार आहे.