फक्त ५ मिनिटात बनवा कैरीची हिरवी चटणी; जाणून घ्या रेसिपी
Kkhushi Niramish
उन्हाळ्यात कच्च्या कैरीची चटणी जेवणाला वेगळी चव देईल. सोबतच कैरीतील पोषकतत्वे ही मिळतील. कैरीची तिखट हिरवी चटणी बनवण्यासाठी कैरी, खोबरं, लसून, कोथिंबिर, हिरव्या मिरच्या, जीरे, मीठ कढीपत्ता, मोहरी आणि तेल हे साहित्य लागते. सर्वप्रथम कैरी धुवून घ्या.
कैरी छान धुतल्यानंतर कैरीचे साल काढून घ्या.
नंतर कैरीचे दोन तुकडे करून आतील कोय काढून घ्या.
कैरीचे बारीक तुकडे करा.
यामध्ये खोबरं हिवरी मिरची लसून घाला.
त्यावर जिरे आणि कोथिंबिर घालून हे सर्व मिश्रण मिक्सरमध्ये बारीक करून घ्या.
ही चटणी मिक्सरमधून एका वाटीत काढून घ्या.
पॅनमध्ये एक चमचा तेल घालून त्याला कढीपत्ता आणि मोहरीची फोडणी द्या. हे तेल वरून चटणीत घाला.