फक्त दोन आंबे आणि २ मिनिटांत बनवा घरच्या घरी थंडगार मँगो लस्सी

Kkhushi Niramish

उन्हाळा सुरू आहे. फळांचा राजा आंब्याची बाजारात रेलचेल आहे. अशात आंबा लस्सी पिण्याचा मोह आवरला जात नाही. मात्र, बाजारात जास्त पैसे देऊन आंबा लस्सी पिण्यापेक्षा घरच्या घरी फक्त दोन आंबे आणि सोबत दही घेऊन तुम्ही घरच्या घरी छान आंबा लस्सी बनवू शकता. पाहा साहित्य आणि रेसिपी (All Photo - You Tube - Swati's Healthy Kitchen)
सर्व प्रथमी दोन मोठे आंबे छान धुवून त्यांचा पूर्ण गर एका वाटीत काढून घ्या.
आता मिक्सरमध्ये आंबा आणि दही मिक्स करून घ्या.
या मिश्रणात तुम्हाला हवी तेवढी साखर विलायची पूड घाला.
हे मिश्रण मिक्सरमधून छान फेटून काढा
आंबा लस्सी तयार आहे. ही लस्सी आता काचेच्या ग्लासमध्ये भरून घ्या.
सर्व्ह करण्यासाठी ग्लास भरताना दोन बोट खाली ठेवावा. ते दिसायला छान दिसते.
यामध्ये वरून काजू टाकावे. तुम्हाला आणखी सुका मेवा घालायचा असल्यास तुम्ही तो घालू शकता. छान थंडगार आंबा लस्सी तयार आहे.