घरच्या घरी बनवा Veg Mayonnaise किंवा मोमोज सोबत खाण्यासाठी काजूची स्पेशल चटणी ते सुद्धा अगदी सोप्या पद्धतीने

Kkhushi Niramish

Veg mayonnaise किंवा काजूची चटणी बनवण्यासाठी फारसे साहित्य लागत नाही. तसेच अगदी झटपट बनवू शकता.
सर्वप्रथम काजू एका पातेल्यात घेऊन ते हलके मऊ होईपर्यंत उकडून घ्या.
उकडलेले काजू मिक्सरमध्ये काढून घ्या, थोडे गार होऊ द्या.
आता यात एक मोठा कप किंवा ग्लासभरून दूध अॅड करा.
यामध्ये दोन पाकळ्या लसून घाला.
आता यात चवीनुसार मीठ टाका
आता हे मिश्रण मिक्सरमधून एकजीव करून घ्या. काजूची पूर्ण पेस्ट होईल याची काळजी घ्या.
टेस्टी व्हेज मयोनिज किंवा काजूची खास चटणी तयार आहे.
रेसिपी नक्की ट्राय करा आणि मोमोजसोबत आस्वाद घेत खा...