Beauty Tips : मेकअप काढताना 'या' चुका टाळा; नाहीतर त्वचा होऊ शकते खराब

Mayuri Gawade

दिवसभर मेकअप केल्यानंतर तो व्यवस्थित न काढता झोपणं त्वचेसाठी नुकसानकारक ठरू शकतं.
मेकअप नीट साफ न केल्यास त्वचेची छिद्र बंद होऊन पुरळ आणि निस्तेजपणाचा त्रास वाढू शकतो.
डोळ्यांभोवतीची त्वचा नाजूक असल्यामुळे काजळ किंवा मस्कारा काढताना चेहरा जोरात घासणं टाळा.
फक्त फेसवॉशने वॉटरप्रूफ मेकअप पूर्णपणे निघत नाही; मायसेलर वॉटर किंवा मेकअप रिमूव्हरचा वापर करणं महत्त्वाचं ठरतं.
खूप गरम पाण्याने चेहरा धुतल्यास त्वचेतील नैसर्गिक ओलावा कमी होऊ शकतो.
चेहरा धुतल्यानंतर टॉवेलने त्वचा रगडण्याऐवजी हलक्या हाताने टिपून कोरडी करणं अधिक चांगलं मानलं जातं.
मेकअप काढल्यानंतर मॉइश्चरायझर लावल्यास त्वचा मऊ, तजेलदार आणि हायड्रेटेड राहण्यास मदत मिळते.
मेकअप ब्रश आणि ब्युटी ब्लेंडर नियमित स्वच्छ न ठेवल्यास त्वचेवर जंतू वाढून संसर्गाचा धोका वाढू शकतो. | All Images : AI Generated