पन्नाशीतही इतकी फिट! मलायका अरोराच्या घरातील योगा सेशनचे खास फोटो पाहा
Mayuri Gawade
बॉलीवूडची फिटनेस क्वीन मलायका अरोरा वयाच्या पन्नाशीतही आपल्या फिटनेस आणि ग्लॅमरस लूकमुळे कायम चर्चेत असते.
नियमित योगा, वर्कआउट आणि हेल्दी लाइफस्टाइलमुळे ती आजही तरुणींना टक्कर देताना दिसते.
यावेळी ‘कर्ली टेल्स’च्या कामिया जानीसोबत तिच्या आलिशान घरात झालेल्या खास योगा सेशनचे फोटो समोर आले आहेत.
या सेशनमध्ये दोघींनी विविध योगासने करत फिटनेसची झलक दाखवली आहे.
एका फोटोमध्ये मलायका आत्मविश्वासाने शीर्षासन करताना दिसते, ज्यातून तिची स्ट्रेंथ आणि बॅलन्स स्पष्ट होतो.
मलायकाच्या घराचा प्रत्येक कोपरा शांत, सुंदर आणि पॉझिटिव्ह ऊर्जा देणारा असल्याचेही या फोटोंमधून दिसून येते.
योगा सेशननंतर दोघींनी एकत्र बसून हेल्दी ड्रिंकचा आनंद घेत रिलॅक्स वेळ घालवला.
मलायका आणि कामिया यांची ही फिटनेस केमिस्ट्री चाहत्यांना विशेष आवडली असून सोशल मीडियावरही ती चर्चेत आहे.
पन्नाशीतही फिटनेसला प्राधान्य देत मलायका अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरत असल्याचे पुन्हा एकदा या फोटोंमधून दिसून येते. | Instagram : (Malaika & Kamiya)