मानसी नाईकच्या रूपावर झाले सगळे घायाळ!

Swapnil S

मानसी नाईक ही मराठी अभिनेत्री, नर्तकी आहे. तिने मराठी चित्रपट, तसेच दूरचित्रवाणी माध्यमांतून अभिनय केला आहे.
अभिनयासोबतच ती नृत्यही करते. २००७ ला 'जबरदस्त' या मराठी चित्रपटाद्वारे हिने चित्रपटक्षेत्रात प्रवेश केला.
ई टीव्ही मराठी या दूरचित्रवाहिनीवरून प्रसारित होणाऱ्या 'चार दिवस सासू'चे या मालिकेतील मुख्य नायिकेची तिने साकारलेली भूमिका विशेष गाजली होती. 'वाट बघतोय रिक्षावाला' तसेच 'बाई वाड्यावर या' या गीतांनी तिला विशेष ओळख मिळवून दिली.
नुकतेच मानसीने काळ्या साडीमधले काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
तिने त्यावर केस मोकळे सोडून आणि कपाळावर चंद्रकोर लावली आहे.