निळ्या साडीत मानसी नाईकचा मराठमोळा अंदाज; चाहत्यांच्या खिळल्या नजरा
किशोरी घायवट-उबाळे
मानसी नाईकने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या नव्या फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.
पारंपरिक निळ्या रंगाच्या साडीत मानसीचा लूक अत्यंत आकर्षक दिसत आहे.
नाजूक बिंदी आणि सोनेरी झुमक्यांनी तिचा लूक खुलून आला आहे.
निळ्या काचेच्या बांगड्यांमुळे पारंपरिक लूकला अधिकच चार चाँद लागले आहेत.
मोकळे केस आणि पांढऱ्या-पिवळी फुलं तिच्या सौंदर्यात भर घालत आहे.
हलका मेकअप आणि कपाळावरील छोटी निळी टिकली तिच्या लूकचे खास आकर्षण ठरले.
चेहऱ्यावरील प्रसन्न स्मितामुळे प्रत्येक फोटो अधिक सुंदर दिसत आहे.
मानसीच्या या फोटोंवर चाहते भरभरून लाइक्स आणि कौतुकाच्या कमेंट्स करत आहेत.
पारंपरिक मराठमोळ्या स्टाईलमुळे मानसी नाईकचा हा लूक सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.