Ganeshotsav 2026 : गणरायाच्या भक्तीत रमले मराठी कलाकार; पाहा घरच्या बाप्पाची सुंदर झलक

किशोरी घायवट-उबाळे

अभिनेता गौरव घाटणेकर आणि अभिनेत्री श्रुती मराठे यांच्या घरी गणरायाची फुलांनी सजावट करण्यात आली होती.
अभिनेत्री रेश्मा शिंदे हिच्या घरी पारंपारिक पद्धतीने आंब्याची पानं, झेंडूची फुलं यांचा वापर करून सजावट करण्यात आली होती.
अभिनेत्री आणि नृत्यांगना मानसी नाईक हिच्या घरी एका टेबलवर जांभळ्या रंगाचे काठपदराचे कापड टाकून त्यावर गणरायाची छोटीशी मूर्ती विराजमान केली असून व्हाईट आणि पिंक फुलांची थीम साकारण्यात आली होती.
अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने लग्नानंतरचा पहिलाच गणेशोत्सव आनंदाने साजरा केला. ढगांची थीम साकारत बाप्पाची सजावट करण्यात आली होती.
फुलांच्या माळा, चौकटींची हिरवी साडी यांच्या मदतीने सजावट करून अभिनेत्री रिंकू राजगुरूच्या घरी छोट्या बाप्पाचे रूप पाहायला मिळाले.
अभिनेत्री मधुरा जोशीने साउथ इंडियन थीम साकारत लाडक्या बाप्पासाठी केळीच्या पानांची सजावट केली होती. लाल रंगाच्या मातीने सजलेले बाप्पाचं रूप फेटा आणि जास्वंदाच्या फुलांनी सजवण्यात आले होते.
अभिनेत्री शर्वरी जोगच्या घरी बाप्पाची पाटावर सजलेली छोटीशी मूर्ती पाहायला मिळाली. पिंक आणि व्हाईट थीम साकारत हिरव्या वेलींनी सजावट करण्यात आली होती.
यावर्षी गणेशोत्सवात अनेक मराठी कलाकारांच्या घरी बाप्पाची छोटी आणि पर्यावरणपूरक मूर्ती पाहायला मिळाली.