घरात लग्नाची लगबग, पार्लरला जायला वेळ नाही? फक्त ८ स्टेप्समध्ये करा मिनी फेशियल

Mayuri Gawade

लग्नसराई सुरू झाली आहे. घरातील लग्नाच्या तयारीदरम्यान स्वतःसाठी पार्लरला जायला वेळ मिळत नाहीये? मग घरीच करा मिनी फेशियल.
लग्नाच्या गडबडीत त्वचेची काळजी घेण्यासाठी आधी चेहरा स्वच्छ धुवा आणि बेसन-दुधाने हलक्या हाताने मसाज करा.
चेहऱ्यावरील मृत त्वचा काढण्यासाठी बेसन, साखर आणि दूध एकत्र करून तयार केलेल्या मिश्रणाने हलक्या हाताने स्क्रब करा.
दिवसभराच्या धावपळीमुळे चेहऱ्यावर धूळ आणि मळ साचतो. यासाठी काही वेळ कोमट पाण्याची वाफ घ्या.
चेहऱ्याला तजेलदार लूक देण्यासाठी बेसन, दही आणि चिमूटभर हळद एकत्र करून फेसपॅक तयार करा.
त्वचा मऊ करण्यासाठी चेहऱ्यावर कोरफडीचा गर लावा आणि ५ ते ६ मिनिटे हलक्या हाताने मसाज करा.
चेहऱ्यावरील सूज कमी करण्यासाठी मऊ कपड्यात गुंडाळलेला आइस क्यूब हलक्या हाताने फिरवा.
फेशियलच्या शेवटी चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावा, यामुळे त्वचेतील ओलावा टिकून राहण्यास मदत होईल.
शेवटी चेहऱ्यावर गुलाब पाण्याचा फवारा मारा. अशा प्रकारे घरच्या घरी मिनी फेशियल करून लग्नासाठी तयार व्हा. | All Photos : AI Generated