ब्रेकअपनंतर कधीच करू नका 'या' ७ चुका, नाहीतर...

Suraj Sakunde

ब्रेकअपनंतर होणारा त्रास सहन करणं एवढं सोपं नसतं. काही लोक ब्रेकनंतर खचून जातात. अनेक लोक नैराश्यग्रस्त होतात.

तज्ज्ञांच्या मते, ब्रेकअपनंतर आपल्या भावना कोणत्या ना कोणत्या रूपात बाहेर पडतात. अशा परिस्थितीत आपण त्यापासून वाचायला हवं.

ब्रेकअपनंतर काही गोष्टी करणं टाळायला हव्यात. नाहीतर तुमच्या दुःखात आणखी भर पडेल आणि तुम्हाला त्यातून बाहेर पडण्यासाठी आणखी वेळ लागू शकतो.

ब्रेकअप झाल्यानंतर त्याच्या कारणांचा विचार करणं बंद करायला हवं. तुमच्या जोडीदाराच्या आयुष्यात दुसऱ्या व्यक्तीच प्रवेश झाल्यामुळं त्यानं तुम्हाला सोडलं असेल, तर ते स्विकारायला हवं आणि स्वतःला सावरायला हवे. अशा परिस्थितीत तुम्ही तुमचं मन अन्य ठिकाणी डायव्हर्ट करू शकता.

ब्रेकअपनंतरही तुम्ही कधी तुमच्या एक्स गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड पुन्हा संपर्कात याल, याची अपेक्षा करू नये. तुमचा जोडीदार तुम्हाला सोडून गेलाय हे तुम्ही मान्य करायला हवे आणि आयुष्यात पुढे जायला हवे.

ब्रेकअपनंतर आपल्या एक्स जोडीदाराशी इन्स्टा किंवा अन्य सोशल मीडिया अकाऊंटवर फॉलो करणं टाळावं. त्यामुळं तुम्हाला जास्त त्रास होऊ शकतो.

ब्रेकअप झाल्यानंतर व्यक्ती मानसिकदृष्ट्या खचून जातो आणि सेल्फ रिस्पेक्ट गमावून बसतो. अशा परिस्थितीत तुमचा पार्टनर जर धोकेबाज असेल, तर त्याच्या चुकीच्या वागण्याला स्वतःला जबाबदार धरू नये. पुन्हा पुन्हा त्या व्यक्तीला कॉल करू नये किंवा भेटण्यासाठी प्रयत्नही करू नये...

तुम्हाला सोडून गेलेला व्यक्ती परत माघारी येणार नाही, हे तुमच्या मनाला समजावून सांगा. जो व्यक्ती तुम्हाला सोडून गेलाय, त्याच्या परतीची वाट पाहत, स्वतःच्या आयुष्याशी खेळू नये.

तुम्हाला हे मान्य करावं लागेल की, तुमच्या बोलण्याचा समोरच्या व्यक्तीवर काहीही परिणाम होत नाहीये. तुम्ही त्या व्यक्तीसमोर हात जोडताय आणि त्याला या गोष्टीचा अभिमान वाटत असेल, तर तो व्यक्ती तुमच्या लायक नव्हता, हे मान्य करायला हवं.

तुमच्या सोशल मीडिया हॅण्डलवर दुखःद पोस्ट करू नका. स्वतःवर विश्वास ठेवा आणि स्वतःला वेळ द्या. मिळालेल्या अनुभवातून शिका आणि स्वतःला समृद्ध करायचा प्रयत्न करा. आयुष्य आनंदात जगणं सुरु करा.