Summer Tips : कडक उन्हात मोबाईल गरम होतोय? लगेच करा 'हे' उपाय

किशोरी घायवट-उबाळे

कडक ऊन, जास्त वापर आणि गरम वातावरणामुळे मोबाईल ओव्हरहिट होऊ शकतो. | (सर्व छायाचित्रे: Yandex)
फोन गरम झाल्यावर कव्हर काढल्यास हवा खेळती राहते आणि मोबाईल लवकर थंड होतो.
मोबाईल नेहमी सावलीत किंवा थंड जागी ठेवा, थेट सूर्यप्रकाश टाळा.
चार्जिंगदरम्यान फोन गरम होत असल्यास लगेच चार्जर काढा.
फोन गरम असताना गेम, व्हिडिओ किंवा कॅमेरा वापरणे टाळा.
जास्त ब्राइटनेस फोनचे तापमान वाढवतो, त्यामुळे Auto-Brightness वापरा.
एकाच वेळी अनेक ॲप्स चालू असल्यास फोनवर ताण येतो आणि तो गरम होतो.
GPS, Bluetooth, Wi-Fi गरज नसताना बंद ठेवा - ही फीचर्स सतत चालू ठेवल्यास बॅटरी आणि प्रोसेसरवर ताण वाढतो.
डुप्लिकेट चार्जरमुळे फोन गरम होण्याचा आणि बॅटरी खराब होण्याचा धोका वाढतो.
सॉफ्टवेअर अपडेट्समुळे मोबाईलचा परफॉर्मन्स सुधारतो आणि हीटिंग कमी होऊ शकते.
फोन पटकन थंड करण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवल्यास तो कायमचा खराब होऊ शकतो.
वारंवार गरम होत असेल तर सर्व्हिस सेंटरला भेट द्या - फोन सतत गरम होत असल्यास तांत्रिक तपासणी करून घेणे गरजेचे आहे.
(Disclaimer: यामध्ये दिलेली माहिती सामान्य मार्गदर्शनासाठी आहे. नवशक्ति' यातून कोणताही दावा करत नाही.)