पाऊस अन् गरमागरम चहा; अवघ्या १५ मिनिटांत बनवा 'हे' कुरकुरीत स्नॅक्स
किशोरी घायवट-उबाळे
पनीर कटलेट : पनीर, मसाले आणि भाज्यांपासून तयार होणारे हे कटलेट चविष्ट, पौष्टिक आणि झटपट बनतात. | (सर्व छायाचित्रे :Yandex)
कांदा भजी : पावसाळा आणि गरमागरम कांदा भजी हे अटळ समीकरण. पुदिन्याच्या चटणीसोबत यांची चव आणखी छान लागते.
चिली गार्लिक पोटॅटो बाइट्स : बटाटा, लसूण आणि तिखट मसाल्यांचा तडका असलेले हे बाइट्स प्रत्येक घासात भन्नाट चव देतात.
ओनीयन रिंग्स : कुरकुरीत बॅटरमध्ये तळलेले ओनीयन रिंग्स सॉस किंवा डिपसोबत खायला अतिशय स्वादिष्ट लागतात.
पोहे फ्राईज : पोहे आणि बटाट्यांपासून तयार होणारे हे हटके फ्राईज मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतात.
व्हेजिटेबल पकोडे : बटाटा, पालक, फ्लॉवर किंवा मिक्स भाज्यांचे पकोडे पावसाळ्यातील चहाची मजा दुप्पट करतात.
कॉर्न चीज बॉल्स : स्वीट कॉर्न आणि चीजपासून तयार होणारे कुरकुरीत बॉल्स पाहुण्यांसाठीही परफेक्ट झटपट स्नॅक ठरतात.
ब्रेड रोल : बटाट्याच्या मसालेदार सारणाने भरलेले कुरकुरीत ब्रेड रोल संध्याकाळच्या चहासाठी उत्तम पर्याय ठरतात.