पावसाळ्यात कारच्या काचेवरील धुकं होईल छूमंतर! फक्त 30 सेकंदांत मिळेल Clear View

Mayuri Gawade

पावसाळ्यात कारच्या विंडशील्ड आणि साइड मिररवर धुकं जमा होणं ही अनेक ड्रायव्हर्सची सामान्य समस्या आहे. त्यामुळे समोरचं दृश्य धूसर दिसू लागतं.
धुकं दिसताच एसीचं तापमान सर्वात कमी करण्याऐवजी योग्य सेटिंग वापरणं अधिक फायदेशीर ठरतं.
कार सुरू केल्यानंतर सर्वप्रथम 30 ते 60 सेकंदांसाठी खिडक्या थोड्या उघड्या ठेवा. त्यामुळे केबिनमधील ओलसर हवा बाहेर पडते.
यानंतर खिडक्या बंद करून एसी Fresh Air Mode वर सेट करा. यामुळे बाहेरची ताजी हवा केबिनमध्ये येते.
एसी सुरू ठेवून तापमान थोडं गरम ठेवा आणि एअर व्हेंटची दिशा थेट विंडशील्डकडे करा. काही सेकंदांत धुकं कमी होऊ लागतं.
तुमच्या कारमध्ये Defogger किंवा Defrost बटण असेल तर ते वापरा. हे फीचर आपोआप योग्य सेटिंग सुरू करून काच स्वच्छ करण्यात मदत करतं.
धुकं हटवताना Recirculation Mode सुरू करू नका. यामुळे केबिनमधील ओलावा वाढून धुकं आणखी वाढू शकतं.
नेहमी Fresh Air Mode वापरा. हा मोड बाहेरची हवा आत आणून तिच्यातील ओलावा कमी करतो आणि काच लवकर स्वच्छ होण्यास मदत करतो.
या सोप्या स्टेप्स फॉलो केल्यास पावसाळ्यातही कारच्या काचांवरील धुकं अवघ्या 30 सेकंदांत दूर होईल आणि ड्रायव्हिंग अधिक सुरक्षित बनेल. | All Photos : AI Generated