पावसाळ्यात डेंग्यू-चिकुनगुनियाचा धोका! 'या' ९ महत्त्वाच्या गोष्टी नक्की पाळा
Mayuri Gawade
पावसाळ्यात साचलेलं पाणी डासांच्या प्रजननासाठी पोषक ठरतं. त्यामुळे डेंग्यू आणि चिकुनगुनियाचा धोका वाढू शकतो.
घराच्या आजूबाजूला पाणी साचू देऊ नका. कुलर, टायर, कुंड्या आणि रिकाम्या डब्यांची नियमित स्वच्छता करा.
डेंग्यू आणि चिकुनगुनिया पसरवणारे डास प्रामुख्याने सकाळी आणि संध्याकाळी अधिक सक्रिय असतात.
डासांपासून बचावासाठी पूर्ण बाह्यांचे, सैल आणि हलक्या रंगाचे कपडे परिधान करा.
घराबाहेर पडताना डास प्रतिबंधक क्रीम, स्प्रे किंवा रोल-ऑनचा वापर करायला विसरू नका.
दारे-खिडक्यांना जाळ्या लावा आणि झोपताना मच्छरदाणीचा वापर करून डासांपासून संरक्षण करा.
व्हिटॅमिन Cयुक्त फळे, पालेभाज्या आणि पुरेसे पाणी यांचा आहारात समावेश करून रोगप्रतिकारशक्ती मजबूत ठेवा.
अचानक ताप, अंगदुखी, डोकेदुखी, डोळ्यांमागे वेदना किंवा लाल पुरळ दिसल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या.
स्वच्छ परिसर, योग्य काळजी आणि वेळेवर उपचार यामुळे डेंग्यू व चिकुनगुनियाचा धोका मोठ्या प्रमाणात कमी करता येतो. | All Photos : Ai Generated