पावसाळ्यात बाहेर पडताय? मग बॅगेत 'या' वस्तू ठेवायला विसरू नका
किशोरी घायवट-उबाळे
फोल्डेबल छत्री - अचानक सुरू होणाऱ्या पावसापासून बचावासाठी नेहमी बॅगेत छोटी फोल्डेबल छत्री ठेवा. | (सर्व छायाचित्रे: Yandex)
रेनकोट - जोरदार पावसात कपडे आणि महत्त्वाच्या वस्तू भिजू नयेत यासाठी हलका रेनकोट उपयोगी पडतो.
वॉटरप्रूफ मोबाईल पाऊच - मोबाईल, कागदपत्रे आणि रोख रक्कम सुरक्षित ठेवण्यासाठी वॉटरप्रूफ पाऊच आवश्यक आहे.
छोटा टॉवेल - चेहरा, हात किंवा केस पटकन पुसण्यासाठी मायक्रोफायबर टॉवेल नेहमी सोबत ठेवा.
मास्क किंवा रुमाल - भिजलेला मास्क वापरण्यापेक्षा कोरडा मास्क किंवा स्वच्छ रुमाल जवळ असणे अधिक सुरक्षित.
सॅनिटायझर आणि वेट वाइप्स - चिखल, घाण आणि जंतूंपासून हात स्वच्छ ठेवण्यासाठी हे नेहमी उपयोगी पडतात.
पॉवर बँक - पावसामुळे वीज किंवा नेटवर्कच्या अडचणी येऊ शकतात, त्यामुळे चार्जिंगची सोय ठेवा.
पाण्याची बाटली - दमट हवामानातही शरीराला पुरेसे पाणी मिळणे गरजेचे असते.
आवश्यक औषधे - सर्दी, डोकेदुखी, ॲलर्जी किंवा इतर नियमित औषधे छोट्या पाउचमध्ये ठेवा.
स्नॅक्स - वाहतूक कोंडी किंवा पावसामुळे उशीर झाल्यास हलका खाऊ उपयुक्त ठरतो.