पावसाळ्यात पांढरे कपडे घालताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा; लूक राहील नेहमी फ्रेश
किशोरी घायवट-उबाळे
पांढरे कपडे आणि पावसाळा - पांढरे कपडे पावसाळ्यातही स्टायलिश दिसतात, मात्र ते स्वच्छ आणि डागविरहित ठेवण्यासाठी थोडी अधिक काळजी घ्यावी लागते.
पावसात बाहेर पडताना काळजी - पावसाचा अंदाज असेल तर पांढरे कपडे घालण्यापूर्वी विचार करा, कारण चिखलाचे डाग कपड्यांवर सहज लागू शकतात.
योग्य फॅब्रिक निवडा - पावसाळ्यात कॉटन किंवा पटकन सुकणारे हलके फॅब्रिक निवडल्यास कपडे ओलसर राहण्याचा त्रास कमी होतो.
पारदर्शकता टाळा - पांढरे कपडे ओले झाल्यावर पारदर्शक दिसू शकतात, त्यामुळे आतून योग्य रंगाचे इनरवेअर किंवा स्लिप वापरा.
डाग लगेच काढा - चिखल किंवा इतर डाग लागल्यास ते सुकण्याची वाट न पाहता शक्य तितक्या लवकर स्वच्छ करा.
कपडे ओले ठेवू नका - पावसामुळे कपडे ओले झाले तर ते लगेच वाळत घाला; बराच वेळ ओलसर ठेवल्यास दुर्गंधी येऊ शकते.
ॲक्सेसरीजची निवड - पांढऱ्या आउटफिटसोबत रंगीत बॅग, छत्री किंवा ॲक्सेसरीज वापरल्यास साधा लूक अधिक आकर्षक दिसतो.
पावसाळी लूक करा परफेक्ट - पांढरे कपडे, वॉटरप्रूफ फुटवेअर आणि स्टायलिश छत्री यांचे योग्य कॉम्बिनेशन करून पावसाळ्यातही एलिगंट लूक मिळवा.
(Disclaimer: यामध्ये दिलेली माहिती सामान्य मार्गदर्शनासाठी आहे. नवशक्ति' यातून कोणताही दावा करत नाही.)