पावसाळ्यात लाईटभोवती भिरभिरणाऱ्या कीटकांचा त्रास? हे सोपे उपाय येतील कामी

Mayuri Gawade

पावसाळा सुरू होताच संध्याकाळी लाईटभोवती लहान पंखांचे कीटक मोठ्या प्रमाणात जमा होतात. काही सोपे उपाय करून हा त्रास कमी करता येतो.
ज्या लाईटभोवती कीटक जास्त येतात, त्या खाली पाण्याने भरलेले पसरट भांडे ठेवा. प्रकाशाच्या परावर्तनामुळे अनेक कीटक पाण्यात पडतात.
मोहरीचे तेल लावलेली प्लास्टिकची पिशवी एलईडी बल्बजवळ टांगल्यास कीटक त्याकडे आकर्षित होतात आणि त्यात अडकून राहतात.
घराच्या कोपऱ्यांत किंवा खिडक्यांजवळ कापूर जाळा. त्याचा तीव्र सुगंध भिरभिरणाऱ्या कीटकांना दूर ठेवण्यास मदत करतो.
अर्धा कापलेला लिंबू आणि त्यात खोचलेल्या ५-६ लवंगा खिडकी किंवा दरवाजाजवळ ठेवा. या नैसर्गिक सुगंधामुळे कीटक घरात येण्याचे प्रमाण कमी होते.
संध्याकाळी कडूलिंबाच्या तेलाचा दिवा लावा किंवा कापूर जाळा. त्यातून येणारा वास अनेक उडणाऱ्या कीटकांना दूर ठेवतो.
स्प्रे बॉटलमध्ये पाणी आणि थोडा लिक्विड सोप किंवा डिटर्जंट मिसळून कीटक जास्त असलेल्या भागावर फवारा. हा उपायही प्रभावी ठरू शकतो.
एका छोट्या वाटीत ॲपल सायडर व्हिनेगर आणि काही थेंब डिशवॉश लिक्विड मिसळून लाईटजवळ ठेवा. त्याकडे आकर्षित झालेले कीटक त्यात अडकतात.
हे सोपे घरगुती उपाय वापरल्यास पावसाळ्यात लाईटभोवती भिरभिरणाऱ्या कीटकांचा त्रास कमी होईल आणि घरही स्वच्छ राहील. | All Photo : AI Generated