पावसात ओले बूट घालण्याची सवय पडू शकते महागात; 'अशी' घ्या पायांची काळजी

किशोरी घायवट-उबाळे

ओले बूट लगेच वाळवा : पाऊस लागल्यानंतर बूट बंद ठेवू नका. हवेशीर ठिकाणी पूर्णपणे वाळवल्यानंतरच पुन्हा वापरा. | (सर्व छायाचित्रे: Yandex)
ओले मोजे त्वरित बदला : ओले मोजे जास्त वेळ घातल्यास बुरशी आणि जंतू वाढतात, त्यामुळे शक्य तितक्या लवकर कोरडे मोजे घाला.
पाय स्वच्छ आणि कोरडे ठेवा : घरी आल्यानंतर पाय साबणाने धुवून बोटांमधील जागाही नीट कोरडी करा.
बुटांमध्ये अँटीफंगल पावडर वापरा : अँटीफंगल पावडर किंवा फूट पावडर वापरल्यास दुर्गंधी कमी होते आणि संसर्गाचा धोका घटतो.
एकाच बुटांचा सलग वापर टाळा : बूट पूर्णपणे वाळण्यासाठी वेळ मिळावा म्हणून दोन जोड बूट आलटून-पालटून वापरा.
खाज किंवा लालसरपणा दिसल्यास दुर्लक्ष करू नका : पायांवर खाज, पुरळ किंवा दुर्गंधी कायम राहिल्यास त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या.
(Disclaimer: यामध्ये दिलेली माहिती सामान्य मार्गदर्शनासाठी आहे. नवशक्ति' यातून कोणताही दावा करत नाही.)