कुंडीतल्या मातीमध्ये मुंग्या अन् रोपाला कीड लागली ? पावसाळ्यात हे ५ घरगुती उपाय ठरतील उपयोगी

Mayuri Gawade

पावसाळ्यात सतत ओलसर राहणाऱ्या मातीमुळे कुंड्यांमध्ये मुंग्या, बुरशी आणि विविध प्रकारची कीड वाढू शकते.
मातीमध्ये जास्त पाणी साचल्यास झाडांच्या मुळांना हवा मिळत नाही आणि रोपांची वाढ थांबू शकते.
कुंडीच्या मातीवर हळद आणि दालचिनी पावडर पसरवल्यास मुंग्या आणि गोगलगायींचा त्रास कमी होण्यास मदत होते.
एक लिटर कोमट पाण्यात कडुनिंबाचे तेल आणि काही थेंब लिक्विड सोप मिसळून पानांवर फवारल्यास किडीचा प्रादुर्भाव कमी होऊ शकतो.
अंड्याची बारीक केलेली टरफले किंवा लाकडाची कोरडी राख मातीवर पसरवल्यास गोगलगायी रोपांपासून दूर राहण्यास मदत होते.
कुंडीच्या तळाशी असलेली छिद्रे मोकळी ठेवल्यास अतिरिक्त पाणी बाहेर पडते आणि मुळे कुजण्याचा धोका कमी होतो.
आठवड्यातून एकदा कुंडीतील वरची माती हलकीशी सैल केल्यास मातीत हवा खेळती राहते आणि ओलावा कमी होतो.
सूर्यप्रकाश मिळालेल्या दिवशी कुंड्या उजेडात ठेवा आणि सडलेली पाने व फांद्या लगेच कापून टाका.
हे सोपे घरगुती उपाय नियमित केल्यास पावसाळ्यातही रोपे निरोगी, ताजी आणि हिरवीगार राहू शकतात. | All Photos : AI Generated