पावसाळ्यात बागेला नवा बहर देण्यासाठी फॉलो करा 'या' ९ सोप्या टिप्स
Mayuri Gawade
पावसाळ्यात झाडांभोवती वाढलेले गवत आणि तण वेळोवेळी काढून टाका, त्यामुळे झाडांना पुरेसे पोषण मिळेल.
सततच्या पावसामुळे माती कडक होत असेल तर तिची हलकी मशागत करा, जेणेकरून मुळांना हवा मिळेल.
कुंडीत पाणी साचू देऊ नका; योग्य निचरा झाल्यास झाडांची मुळे सडण्यापासून वाचतात.
कडुलिंबाची पेंड वापरल्यास झाडांचे बुरशी आणि किडींपासून संरक्षण होते.
पावसाळा हा कलमे लावण्यासाठी सर्वोत्तम काळ असून त्यांना लवकर मुळे फुटतात.
फुलझाडे आणि भाजीपाल्याच्या बिया पेरण्यासाठी पावसाळा हा अतिशय अनुकूल हंगाम आहे.
वाळलेली फुले, पाने आणि फांद्या काढल्यास झाडांना नवीन फुले येण्यास मदत होते.
मोगरा, जास्वंद, अपराजिता यांसारखी झाडे लावण्यासाठी पावसाळा हा योग्य काळ मानला जातो.
झाडांची कुंडी किंवा जागा बदलायची असल्यास दमट हवामानामुळे पावसाळ्यात ते अधिक सोपे होते. | All Photo : Ai generate