पावसाआधी बागेची करा अशी तयारी; रोपं होतील हिरवीगार अन् टवटवीत

Mayuri Gawade

पावसाळा सुरू होण्यापूर्वी कुंडीतील माती हलकी उकरून मुळांना श्वास घेण्यासाठी जागा करून द्या.
मातीचा वरचा थर सैल केल्याने मुळांपर्यंत ऑक्सिजन अधिक चांगल्या प्रकारे पोहोचतो.
कुंडीत साचलेली सुकलेली पानं, काड्या आणि कचरा वेळेत काढून टाका.
पावसात कुजणारा कचरा मातीची गुणवत्ता खराब करू शकतो, त्यामुळे स्वच्छता महत्त्वाची आहे.
जास्त पाणी सहन न करणाऱ्या रोपांची ओळख करून त्यांची जागा बदलण्याची तयारी ठेवा.
संवेदनशील रोपं पावसाळ्यात आडोशाच्या ठिकाणी ठेवल्यास त्यांची वाढ चांगली होते.
प्रत्येक कुंडीतील ड्रेनेज होल मोकळे आहेत का, याची एकदा खात्री करून घ्या.
पाण्याचा योग्य निचरा न झाल्यास मुळं कुजून रोपांचं नुकसान होऊ शकतं.
पावसाळ्यापूर्वीची ही छोटी तयारी केल्यास पहिल्या पावसानंतर बाग हिरवीगार फुलून येते. | All Photo : Ai Generated