पावसाळ्यात डाळ-तांदळात किडे पडण्याची चिंता वाटते? करा हे ५ सोपे उपाय
Mayuri Gawade
पावसाळ्यातील ओलसर हवेमुळे डाळ, तांदूळ, पीठ आणि इतर किराणा सामान लवकर खराब होऊ शकते.
डाळ आणि तांदळाच्या डब्यात तेजपान ठेवल्यास किडे आणि अळ्या होण्याची शक्यता कमी होते.
रवा आणि पोहे जास्त दिवस चांगले ठेवण्यासाठी त्यांच्या डब्यात काही लवंगा टाकून ठेवा.
कॉफी पावडर किंवा बोर्नव्हिटा ओलसर होऊ नये म्हणून डब्यात तांदूळ भरलेला पेपर नॅपकिन ठेवा.
बिस्किटे, चिवडा, शेव आणि मुरमुरे कुरकुरीत ठेवण्यासाठी डब्यात थोडे तांदूळ ठेवू शकता.
गव्हाचे, ज्वारीचे किंवा इतर कोणतेही पीठ साठवताना त्यात तेजपान, लवंगा किंवा हळकुंड घाला.
किराणा सामान नेहमी स्वच्छ, कोरड्या आणि हवाबंद डब्यांमध्ये साठवल्यास ओलसरपणा कमी होतो.
पावसाळ्यात किराणा सामान वेळोवेळी तपासून त्यामध्ये किडे किंवा बुरशी तर नाही ना, याची खात्री करा.
या छोट्या साठवणूक टिप्समुळे पावसाळ्यातही तुमचे किराणा सामान अधिक काळ ताजे आणि सुरक्षित राहू शकते. | All Photos : Ai Generated