पावसाळ्यात 'अशी' घ्या घराची काळजी; ओलावा आणि बुरशीपासून राहा दूर

किशोरी घायवट-उबाळे

दररोज काही वेळ खिडक्या उघडून ठेवा, त्यामुळे ओलावा कमी होतो आणि ताजी हवा घरात येते. | (सर्व छायाचित्रे: Yandex)
कपाटात सिलिका जेल किंवा कापूर ठेवा : कपाटातील ओलावा शोषला जातो आणि कपड्यांना बुरशीचा वास येत नाही.
भिंतीवरील ओलसर भाग लगेच स्वच्छ करा : ओलसर डाग दुर्लक्षित केल्यास बुरशी वेगाने पसरू शकते.
बेडशीट आणि पडदे नियमित उन्हात वाळवा : ओलसर कापडांमध्ये बुरशी आणि जंतू वाढण्याची शक्यता जास्त असते.
एक्झॉस्ट फॅनचा वापर करा : घरातील अतिरिक्त आर्द्रता कमी करण्यासाठी हा प्रभावी पर्याय ठरतो.
गळती आणि पाण्याचा साठा त्वरित दुरुस्त करा : पाईप किंवा छताची गळती वेळेत दुरुस्त केल्यास ओलावा आणि बुरशीचा धोका कमी होतो.