पावसाळ्यात फरशी पुसल्यानंतरही घरात येतोय कुबट वास? मग एकदा 'हा' उपाय करून पाहाच
Mayuri Gawade
पावसाळ्यातील दमट वातावरणामुळे घरात कुबट वास निर्माण होणे ही अनेकांची सामान्य समस्या असते.
फरशी पुसण्याचा कपडा स्वच्छ ठेवला तर घरातील दुर्गंधी कमी करण्यास मोठी मदत होते.
दोन ते तीन दिवसांतून एकदा पुसण्याच्या पाण्यात अर्धी वाटी व्हिनेगर मिसळल्यास घाण वास कमी होऊ शकतो.
लव्हेंडर किंवा इतर इसेंशियल ऑईलचे काही थेंब पाण्यात टाकल्यास घरभर हलका आणि आल्हाददायक सुगंध पसरतो.
चमचाभर शाम्पू पुसण्याच्या पाण्यात मिसळल्यास फरशी स्वच्छ होण्यासोबतच ताजेपणाही टिकून राहतो.
एरिका पाम, मनीप्लांट आणि पीस लिलीसारखी इनडोअर झाडे घरातील वातावरण अधिक फ्रेश बनवू शकतात.
कापूर, लवंग आणि तेजपान यांचा सुगंध घरातील कुबटपणा कमी करण्यासाठी पारंपरिक उपाय मानला जातो.
तूपाचा दिवा लावून तयार केलेला नैसर्गिक सुगंध घरात सकारात्मक आणि प्रसन्न वातावरण निर्माण करतो.
हे छोटे घरगुती उपाय नियमित केल्यास पावसाळ्यातही घर नेहमी ताजेतवाने आणि सुगंधित राहू शकते. | All Photos : Ai Generated