Monsoon Makeup Tips : पावसातही मेकअप राहील परफेक्ट; लक्षात ठेवा 'या' ७ गोष्टी

किशोरी घायवट-उबाळे

चेहरा स्वच्छ करूनच मेकअप करा - मेकअप करण्यापूर्वी चेहरा चांगला क्लिन्झ केल्यास अतिरिक्त तेल निघून जाते आणि मेकअप जास्त वेळ टिकतो. | (सर्व छायाचित्रे :Yandex)
प्रायमर वापरणे विसरू नका - चांगल्या दर्जाचा प्रायमर लावल्याने मेकअपला मजबूत बेस मिळतो आणि तो पसरत नाही.
वॉटरप्रूफ प्रॉडक्ट्सची निवड करा - मस्कारा, आयलाइनर आणि काजळ नेहमी वॉटरप्रूफ वापरा, त्यामुळे पावसातही लूक खराब होत नाही.
हलका फाउंडेशन किंवा बीबी क्रीम वापरा - जाड फाउंडेशनऐवजी हलका बेस वापरल्यास मेकअप नैसर्गिक दिसतो आणि वितळत नाही.
कॉम्पॅक्ट किंवा लूज पावडरने मेकअप सेट करा - टी-झोनवर हलकी पावडर लावल्याने चेहरा तेलकट दिसत नाही आणि मेकअप टिकून राहतो.
सेटिंग स्प्रेचा वापर करा - मेकअप पूर्ण झाल्यानंतर सेटिंग स्प्रे लावल्यास तो अधिक वेळ फ्रेश आणि स्मज-फ्री राहतो.
ब्लॉटिंग पेपर नेहमी सोबत ठेवा - चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल पुसण्यासाठी ब्लॉटिंग पेपर वापरा. मेकअप न बिघडवता चेहरा फ्रेश दिसतो.
(Disclaimer: यामध्ये दिलेली माहिती सामान्य मार्गदर्शनासाठी आहे. नवशक्ति' यातून कोणताही दावा करत नाही.)