Monsoon Fashion : पावसाळ्यात ऑफिसला कोणती साडी नेसाल? पाहा स्टायलिश आणि कम्फर्टेबल पर्याय

Mayuri Gawade

पावसाळ्यात ऑफिसला काय घालायचं? स्टायलिश दिसायचंय, पण दिवसभर आरामदायीही वाटायला हवं. योग्य साडीची निवड तुमचा लूक आणि कम्फर्ट दोन्ही वाढवू शकते.
हलके फॅब्रिक, पटकन सुकणारे मटेरियल आणि साधे प्रिंट्स असलेल्या साड्या पावसाळ्यात ऑफिस वेअरसाठी उत्तम पर्याय ठरतात. पाहा अशाच काही सुंदर साडी डिझाइन्स.
पिंक आणि व्हाईट जिओमेट्रिक प्रिंटची कॉटन साडी ऑफिससाठी हलकी आणि आरामदायी आहे. साधे दागिने आणि ब्लॉक हील्ससोबत हा लूक सहज खुलतो.
मोहरी रंगाची हँडब्लॉक प्रिंट कॉटन साडी दिवसभर आराम देते. ऑफिससोबतच कॅज्युअल आउटिंग किंवा प्रवासासाठीही हा लूक परफेक्ट ठरतो.
ऑलिव्ह ग्रीन प्रिंटेड कॉटन साडीवर काळा बॉर्डर असल्याने ती साधी असूनही उठून दिसते. ऑफिस, कॉलेज किंवा सेमी-फॉर्मल कार्यक्रमांसाठी हा लूक छान दिसतो.
ब्लॅक-अँड-व्हाईट प्रिंटेड कॉटन साडी पावसाळ्यात क्लासिक लूक देते. पावसाळी दिवस, ऑफिस किंवा कॅज्युअल फ्रायडेसाठी ही साडी स्टायलिश पर्याय ठरू शकते.
मरून-बेज बटिक प्रिंट कॉटन साडी एलिगंट आणि प्रोफेशनल लूक देते. ऑफिस मीटिंग, प्रेझेंटेशन किंवा एथनिक डे साठी ही साडी योग्य पर्याय आहे.
ब्लॅक हँडलूम कॉटन साडी मिनिमल आणि एव्हरग्रीन लूक देते. सिल्व्हर ज्वेलरी आणि साध्या ब्लाउजसोबत ही साडी ऑफिसपासून छोट्या कार्यक्रमांपर्यंत सहज परिधान करता येते. | all photos : pinterest