पावसाळ्यात कांदा वारंवार सडतोय? 'या' ४ सोप्या टिप्स वापरून महिनाभर ठेवा फ्रेश!
Mayuri Gawade
पावसाळ्यातील दमट हवेमुळे कांदा लवकर मऊ पडतो आणि कुजू लागतो.
कांदा कधीही प्लास्टिकच्या पिशवीत साठवू नका. त्यामुळे ओलावा वाढून तो लवकर खराब होतो.
कांदा नेहमी जाळीदार टोपलीत किंवा हवेशीर ठिकाणीच ठेवा.
बंद कपाट किंवा ओलसर कोपऱ्यात कांदा ठेवणे टाळा. खेळती हवा मिळाल्यास तो जास्त काळ टिकतो.
बटाटे आणि कांदे एकत्र ठेवू नका. त्यामुळे दोन्हीही लवकर खराब होऊ शकतात.
आठवड्यातून एकदा कांद्याची तपासणी करा आणि खराब झालेला कांदा लगेच वेगळा काढा.
योग्य साठवणुकीमुळे कांदा अधिक काळ ताजा राहतो आणि पैशांचीही बचत होते.
या सोप्या किचन टिप्स फॉलो करा आणि पावसाळ्यातही कांदा दीर्घकाळ फ्रेश ठेवा! | All Photos : Ai Generated