पावसाचा आनंद घ्यायचा असेल तर पुण्यातील 'या' पाच ठिकाणांना नक्की भेट द्या

नेहा जाधव - तांबे

पावसाळा सुरू झाला की तरुणांना पर्यटनाचे वेध लागतात. हिरवीगार झाडी, डोंगर, धबधबे आणि ओलाचिंब करणारा पाऊस. यात सर्वच जण नाहून निघतात. यंदा पावसाने लवकर हजेरी लावली आहे. त्यामुळे पावसात फिरण्यासाठी पुण्यातील काही खास ठिकाणे जाणून घेऊया. | Photo - @Nehatambe
पावसात कॅम्पिंग, बोटिंगचे उत्तम ठिकाण म्हणजे पवना तलाव. पावसात पसरलेले निळसर जलाशय आणि आजूबाजूच्या टेकड्यांवर पसरलेली हिरवळ पर्यटकांचे मन वेधून घेते. | Photo - @Nehatambe
खडकवासला धरण हे पावसाळ्यात पुणेकरांचं अत्यंत लोकप्रिय वनडे पिकनिक डेस्टिनेशन आहे. पावसात भरून वाहणारं विशाल जलाशय, त्यावरून वाहणारा पाण्याचा प्रवाह, आणि सभोवतालच्या टेकड्यांवर पसरणारी हिरवळ हे पर्यटकांचे आकर्षण आहे. | Photo - @Nehatambe
भीमाशंकर अभायरण्याचे आगळेवेगळे रूप पावसाळ्यात अनुभवायला मिळते. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले भीमाशंकर मंदिर हे पावसात धुक्यात हरवलेले पाहायला मिळते. हे मंदिर पावसात अतिशय आकर्षक दिसते. | Photo - @FPJ
पुणे आणि कोकणाला जोडणारा सुंदर असा ताम्हीणी घाट. जून ते सप्टेंबर दरम्यान इथे भरपूर पाऊस, धबधबे, धुकं आणि वाऱ्याचा गारवा अनुभवायला मिळतो. येथे जागोजागी धबधबे अनुभवयाला मिळतात. पावसाळ्यात हा घाट हिरवळीची शाल पांघरल्यासारखा दिसतो. | Photo - @Nehatambe
पुण्यातील सर्वात लोकप्रिय ठिकाण म्हणजे सिंहगड. सिंहगडाला ऐतिहासिक वारसा तर आहेच. पण सिंहगडाचे पावसाळी रूप अनुभवण्यासाठी पर्यटकांची गर्दी असते. सिंहगडाच्या पायऱ्या कमी असल्याने हा गड चढण्यासाठी सोपा आहे. पुण्याच्या नैर्ऋत्येला साधारण २५ कि.मी अंतरावर असणारा हा गड पर्यटकांचे आकर्षण आहे. | Photo - @prabhat.vashisht (instagram)