सगळ्याच रोपांना पाऊस मानवत नाही! या ४ झाडांची घ्या खास काळजी

Mayuri Gawade

पावसाळ्यात प्रत्येक रोपाला जास्त पाऊस आवडतोच असे नाही. काही रोपांना थेट पावसापासून दूर ठेवणे आवश्यक असते.
सतत पावसाच्या पाण्यात राहिल्याने काही रोपांची मुळे कुजतात आणि त्यांची वाढही थांबू शकते.
पीस लिली हे इनडोअर रोप असल्याने ते थेट पावसात ठेवू नका. कमी पाणी आणि सावलीची जागा त्यासाठी योग्य ठरते.
झेड झेड प्लांटला खूप कमी पाणी लागते. त्यामुळे पावसाळ्यात हे रोप उघड्यावर ठेवणे टाळा.
स्पायडर प्लांटवर सतत पाऊस पडल्यास त्याच्या पानांची टोके खराब होऊ लागतात. त्यामुळे ते सुरक्षित ठिकाणी ठेवा.
साँग ऑफ इंडिया हे रोप कमी पाण्यात चांगले वाढते. त्यामुळे पावसाळ्यात ते सेमी-शेडमध्ये ठेवणे फायदेशीर ठरते.
ज्या रोपांना जास्त पाऊस सहन होत नाही, ती रोपे छताखाली किंवा थेट पाऊस न लागणाऱ्या ठिकाणी हलवा.
पावसाळ्यात माती आधीच ओलसर असल्यामुळे रोपांना गरजेपेक्षा जास्त पाणी देणे टाळा.
योग्य काळजी घेतल्यास ही रोपे पावसाळ्यातही निरोगी राहतात आणि त्यांची वाढ चांगली होते. | All Photo : Ai Generated