मॉन्सूनमध्ये नक्की ट्राय करा 'हा' देशी चहा, जाणून घ्या रेसिपी

Suraj Sakunde

पावसाळ्यामुळं सर्वत्र वातावरण आल्हाददायक बनलं आहे. बाहेर पाऊस पडत असताना गरमागरम चहा प्यायला मिळाला, तर त्यासारखं स्वर्गीय सुख नाही.
आज आपण मॉन्सून स्पेशल देशी चहा बनवण्याची रेसिपी पाहणार आहोत.
देशी चहासाठी तुम्हाला १ कप पाणी, १ कप दूध, २ टीस्पून चहा पावडर, २-३ हिरवी वेलची, आल्याचा तुकडा, २-३ काळी मिरची, २-३ लवंगा आणि १ दालचिनी लागेल.
याशिवाय ४-५ तुळसीची पानं, २-३ पुदीन्याची पाने, २-३ टीस्पून गुळ किंवा साखर इत्यादी साहित्य लागेल.
सर्वात आधी एका पॅनमध्ये पाणी टाकून ते उकळा.
आलं आणि सर्व पानं धुवून घ्या. आता आलं आणि मसाल्यांना खलबत्त्यात कुटून घ्या.
आता उकळत ठेवलेल्या पाण्यात बारिक केलेले मसाले, आलं आणि तुळस तसे पुदिना मिसळा.
थोड्या वेळानं चहा पावडर टाका आणि १ ते २ मिनिटांपर्यंत उकळा. त्यानंतर दुध टाका.
गूळ किंवा साखर यांपैकी जे तुम्हाला हवं आहे, ते त्यामध्ये टाका. २-३ मिनिटे उकळल्यानंतर ते खाली उतरा.
तुमचा मॉन्सून स्पेशल आरोग्यदायी देशी चहा तयार आहे. आता या चहाचा आनंद घ्या.